Video नालासोपाऱ्यात पोलीस स्टेशनमध्येच ढिश्युम ढिश्युम, दोन गटात तुफान राडा

नेहमी चर्चेत असलेल्या नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्यात दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पोलिसांवरील धाक संपल्याचा प्रश्न उभा राहत असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नालासोपारातील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान पोलिसांचा पोलीस ठाण्यात देखील धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नालासोपारा मधील तुळींज पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटात मंगळवारी फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही हाणामारी चक्क पोलसांसमोरच झाली. या दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाला बाजूला केले. जर पोलीस ठाण्यातच असे दोन गट आपापसात भिडत असतील तर पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र हे भांडण का? व कोण? करत होते याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.