नालासोपाऱयात सुरक्षारक्षकाने कुत्र्याची नऊ पिल्ले नाल्यात फेकली

888

अवघ्या वीस दिवसांपूर्वी जन्माला आलेल्या कुत्र्याच्या नऊ नवजात पिल्लांना सुरक्षारक्षकाने नाल्यात फेकल्याचा अमानुष प्रकार नालासोपाऱ्यात समोर आला. या क्रूर घटनेत एका पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आठ पिल्ले नाल्याच्या आडोशाला थांबल्याने बचावली आहेत. याप्रकरणी सुरक्षारक्षकासह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अद्याप कोणालाही अटक करण्यात न आल्याने प्राणीमित्रांमध्ये संतापाचे वार्ताकरण आहे.

नालासोपारा पूर्कच्या लिंक रोड परिसरातील अग्रवाल सोसायटीमध्ये एका कुत्रीने नऊ पिल्लांना जन्म दिला होता. मात्र 24 तासांपासून पिल्ले त्या ठिकाणी दिसत नसल्याने सोसायटीतील रहिवाशी निशा निकम यांनी ऍनिमल बोर्ड वेल्फेअर ऑफ इंडियाचे मितेश जैन यांना याप्रकरणी माहिती दिली. मितेश जैन यांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात त्यांना कुत्र्याची आठ पिल्ले आढळली. यातील एक पिलू नाल्यातच निपचित पडले होते. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत तपास केला असता सोसायटीत राहणाऱ्या शिवम सिंग यांच्या सांगण्याकरून सोसायटीच्या सुरक्षारक्षक अर्जुन राय याने कुत्र्यांना नाल्यात फेकल्याची कबुली दिली. बिल्डिंगच्या सफाई कर्मचाऱ्याने ही माहिती दिली. बिल्डिंगमधील सीसीटीक्ही फुटेज देण्यास सोसायटीच्या चेअरमन व सभासदांनी नकार दिल्याने आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या