शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या नामदेवराव जाधवांच्या तोंडाला काळे फासले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला पुण्यात काळे फासण्यात आले आहे. पुण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय त्यांच्या तोंडाला काळे फासले.

नामदेवराव जाधव यांचा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे कार्यक्रम होणार होता. मात्र पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी न दिल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देत असताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासत त्यांना चोप दिला.

नामदेवराव जाधव यांना पोलिसांनी डेक्कन पोलीस ठाण्यात नेलं. तर, नामदेवराव जाधव यांनी या घटनेमागं रोहित पवारांचा हात असल्याचा आरोप केल्याची माहिती आहे