आचारसंहिता संपूनही रत्नागिरीत नामफलक झाकलेलेच

538

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपून 22 दिवस उलटले तरी अजून रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहातील उद्घाटनाचे नामफलक अद्यापही झाकून ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास दाखवलेली तत्परता आचारसंहिता संपताच दाखवली नाही. आचारसंहितेच्या काळात विकासकामाचे झाकून ठेवलेल्या  नामफलकावरील कागद काढण्यासाठी प्रशासन सत्तास्थापनेची वाट पहात आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत.

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता 28 ऑक्टोबरपर्यंत होती. याकाळात विकासकामांच्या नामफलकावर कागद चिकटवून ते नामफलक झाकण्यात आले होते. रत्नागिरी शहरातील स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृहातील 16 जून 2006 सालच्या उद्घाटनाचे नामफलक कागदाने झाकण्यात आले होते. आचारसंहिता संपल्यानंतर 22 दिवस उलटूनही नाट्यगृहातील झाकलेल्या नामफलकावरील कागद अजूनही काढण्यात आलेला नाही. प्रशासन सत्तास्थापनेची वाट पहातेय की रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीत पुन्हा नामफलकावर कागद चिकटवण्याचे श्रम वाचविले जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या