
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद घेऊन रुग्णसेवा क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱया नाना पालकर स्मृती समितीने यंदाचे सेवा कार्य पुरस्कार जाहीर केले आहेत. प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे मेडिकल ऑनकॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. मंजू सेंगर आणि नायर रुग्णालय व टोपीवाला मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. आनंद निर्गुडे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ‘डॉक्टर डे’च्या दिवशी 6 जुलै रोजी त्यांना दादर येथील बी.एन. वैद्य सभागृहात सकाळी 10.30 वाजता होणाऱया सोहळय़ात या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
डॉ. रत्नपारखी यांनी पालघरच्या अनेक आश्रमशाळा दत्तक घेतल्या आहेत. त्यांच्या या सेवेचा सन्मान होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळय़ास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे कार्यकारी संचालक आशीषकुमार चौहान, चाणक्य मंडळ परिवारचे अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत बडवे आणि सेव्रेटरी सतीश तांबा यांनी दिली आहे.