देवेंद्र फडणवीस यांचा पेनड्राईव्ह फुसका बॉम्ब; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी एक स्क्रिप्ट तयार केली होती आणि त्या स्क्रिप्टवरून महाविकास आघाडी सरकारला घाबरविण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांचा पेनड्राईव्ह फुसका बॉम्ब आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

परभणी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्ती वितरण कार्यक्रमास पटोले परभणीत आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी एक स्क्रिप्ट तयार केली आणि त्यावरून महाविकास आघाडी सरकारला घाबरविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांचा पेनड्राईव्ह फुसका बॉम्ब असून, याबाबतचे उत्तर त्यांना सभागृहात देणार आहे. खरं तर फडणवीसांना भीती आहे, कारण रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून फडणवीस यांनी अनेकांचे फोन टॅप केले होते, त्यात भाजप नेत्यांचेही फोन टॅप केले होते. त्यामुळे आता कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे, असेही पटोले म्हणाले.