सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार राजकारण करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता कधीच सहन करणार नाही. या लोकांना घरी बसवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
माज आलेलं सरकार, माज आलेली व्यवस्था
राजकोट किल्ल्यावर राणे पिता-पुत्राने दाखवलेल्या सत्तेच्या माजावरही नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. हे माज आलेले सरकार असून माज आलेली व्यवस्था निर्माण झालेली आहे. राणेंचे पुत्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधानं करतात आणि माझ्यावर सागर बंगल्याचा आशीर्वाद असल्याचे म्हणतात. भाजपला सत्तेचा माज आलेला आहे. त्या माजातूनच थेट पोलिसांना चॅलेंज करण्याचे काम सुरू आहे. भाजपच्या खासदारानेही माध्यमांचा बूम ओढून त्यांना धक्का दिले, असेही नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडी 200हून अधिक जागा जिंकेल
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 200हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही आम्हाला जमिनीवरची परिस्थिती माहिती असून कल महाविकास आघाडीच्या बाजुने आहेत. महाविकास आघाडी 200च्या वर जागा जिंकून येईल. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत, याचाही पुनरुल्लेख पटोले यांनी केला.
लोकहो, चूक झाली…हात जोडून माफी मागतो! मालवण पुतळा प्रकरणात अजित पवारांचा जाहीर माफीनामा
सरकारच गुंडांचे पालनपोषण करतंय
कुख्यात गुंड गजा मारणे याने भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एका दहिहंडी कार्यक्रमात सत्कार केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर भाष्य केले. सरकारकडून गुंड आणि माफियांना वाय प्लस सुरक्षा पुरवली जात असून सरकारच गुंडांचे पालनपोषण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
मिंधे सरकारमध्ये गुंड आणि माफियांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. तुरुंगातील गुंडांना पॅरोलवर सोडून किंवा दवाखान्यात दाखल करून फाईल स्टार व्यवस्था दिली जात आहे. सरकारच गुंड आणि माफियांना पोसत आहे. त्यामुळे कुख्यात गुंडाने चंद्रकांत पाटलांचा सत्कार करत दहिहंडी फोडली यात काही नवीन नाही. भाजपमध्ये गुंड आणि माफियांचे पोषण केले जात असल्यामुळे महाराष्ट्र असुरक्षित झालेला आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.
View this post on Instagram