
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर आज 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान आयोजित केला होता. या मोहिमेमध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लाखो स्वयंसेवक सहभागी झाले होते. मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण भरतभर आयोजित केलेल्या या उपक्रमात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी हातात झाडू घेऊन श्रमदानाचा आनंद लुटला.
या स्वच्छता मोहिमेची माहिती देताना डॉ श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक हेमंत कदम म्हणाले की, पदमश्री, महाराष्ट्र भूषण आणि स्वच्छता दूत डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सम्पूर्ण भरत भर स्वच्छता अभियान हाती घेण्यात आला आहे. जी नॉर्थ आणि एफ साऊथ या विभागात हा उपक्रम राबवण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, चैत्य भूमी, सिद्धिविनायक जी /उत्तर विभाग, कबुतरखाना , शिवसेना भवन ते प्लाझा, लालभाग राजा मेन गेट, कॉटन ग्रीन स्टेशन, ज्ञानेश्वर विद्यालय, महर्षी दयानंद कॉलेज, यासह इतर अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेची अधिक माहिती देताना स्वयंसेवक महेश नाईक म्हणाले कि, पदमश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे 2014 पासून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्वच्छतेचा उपक्रम वर्षेतून 3 ते 4 वेळा हाती घेतात. आज देखील सकाळी सात वाजल्यापासून स्वयंसेवक मोठया उत्साहाने सहभागी झाले होते. या आधी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर, पाट-बंधारे, नद्या-नाले, तलावे, विहिर यांची देखील स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच अनंत चतुर्दशीला गिरगाव आणि जुहू चौपाटीला निर्माल्यापासून खत निर्मितीचा उपक्रम राबवण्यात आला. डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून हा विशेष उपक्रम गेल्या पाच-सहा वर्ष पासून आम्ही पार पडत आहोत. आज स्वच्छता अभियानाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
याच महिमेअंतर्गत मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील स्वच्च्छता अभियान मोहिमेत अभिनेत्री वंदना गुप्ते देखील सहभागी झाल्या होत्या. ‘आपण आपले घर जस स्वच्छ ठेवतो तस आपण आपलं अंगण देखील स्वच्छ ठेवले पाहिजे. मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकांनी आज प्रतिज्ञा केली पाहिजे की, आपल्या घरा समोरचा रस्ता देखील तेवढाच स्वच्छ ठेवला पाहिजे. महानगर पालिका आपल्यापरीने काम करत असतेच पण मुंबईतील लोकसंख्या इतकी वाढली आहे कि ते देखील किती करणार? आणि ते आपल्याला कचऱ्याची पेटी देतील पण त्यात कचरा टाकणार कोण? तर तो आपण टाकायचा आहे. आपलं घरासमोरच आंगण आपण झाडलं पाहिजे. आपली स्वतःची देखील ती जबाबदारी आहे. आज माझे पती डेंग्यूने आजारी आहेत तरी देखील मी मुद्दाम या कार्यक्रमात सहभागी झाले. आपल अंगण, आपला रस्ता आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून कार्य केलं पाहिजे. आज इंदौर शहर का स्वच्छ आहे? कारण प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी पाळलेली आहे. त्यामुळे मुंबईतीलच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी ओळखून स्वछता राखली पाहिजे. मी देखील रस्त्यात कुठे कचरा सापडला तर लगेच तो कचरा कुंडीत टाकते. आज या उपक्रमात देखील सहभागी होऊन मला आनंद वाटला आणि प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी त्यांना आवाहन करते, असं गुप्ते यावेळी म्हणाल्या.
एफ साऊथ आणि जी नॉर्थ या विभागातील 13 परिसरात एकूण 1950 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आणि साधारण 2 ते 3 टन कचरा गोळा केला. एफ साऊथ आणि जी नॉर्थ सह मुंबई पालिकेच्या इतर विभागातील स्वच्छता अभियानातही अनेक स्वयंसेवकांनी आपला हातभार लावला आणि श्रमदान हेच श्रेष्ठ दान असल्याचं दाखवून दिलं.
























































