नांदेडचे जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, शासकीय रुग्णालयात उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nanded collector vipin itankar

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवार, 31 ऑगस्ट रोजी त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने माध्यमांना जारी करण्यात आली आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर हे लॉकडाऊन व संचार बंदी काळात जनतेच्या अडचणी व मदत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत स्वत: रस्त्यावर उतरून जनतेला प्रशासनाने जे नियम घालून दिले त्याची अमल बजावणी करत होते.
नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना कोविड ची लक्षणे दिसू लागल्याने 30 ऑगस्ट रोजी त्यांनी विनाविलंब तपासणी करून घेतली. 31 ऑगस्ट रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी कोणत्याही मेट्रो सिटीत उपचारासाठी दाखल न होता नांदेड येथील कोविड शासकीय रुग्णालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, तीन आमदार, उपमहापौर यांच्यासह अनेक अधिकार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा संपर्कातील अनेकजणांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी स्वत: देखील नांदेड येथील रुग्णालयात कोविडचे उपचार घेत असल्याची माहिती दिली आहे.