
सामना ऑनलाईन, नांदेड
नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जण सोमवारी रात्री वाहून गेले होते. या चौघांचाही मृत्यू झाला आहे. मांजरम-कोलंबी पुलावर झालेल्या दुर्घटनेत पती पत्नी आणि त्यांची मुलगी वाहून गेली होती. गंगाधर दिवटे (45),पारुबाई दिवटे (40) आणि अनुसया दिवटे(वय 5वर्ष ) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बहिणीच्या घरी मावंद्याचे (तीर्थस्थळावरून परत आल्यानंतर करण्यात येणारे जेवण) जेवण करून तिचा भाऊ पत्नी आणि मुलीसह रात्री दीडच्या सुमारास हे तवेरा गाडीतून घरी चाललं होतं. अंधार असल्याने आणि पाण्याच्या वेगाचा असताना पाण्याच्या झोताने त्यांची गाडी नाल्यात फेकली गेली. गाडीतून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा गाडीतच मृ़त्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बेंद्री गावाजवळ नाल्यावरून जात असताना विनायक गायकवाड ( 35 वर्ष ) हा तरुण वाहून गेला होता. या तरुणाचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. निवासी जिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी सामनाला ही माहिती दिली आहे.




























































