
शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती करण्याचा शासना आदेश काढल्यानंतर आज नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासनाच्या या आदेशाची होळी करत फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती करण्याचा शासन आदेश जारी करण्यात आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. शिवसेनेने या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी शासना आदेशाची होळी करुन शासनाचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र सरकार हाय हाय, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आगे बढो, आवाज कुणाचा शिवसेनेचा, हिंदी सक्ती लादणार्या फडणवीस सरकारचा निषेध असो, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी सबंध परिसर दणाणून गेला. नांदेडच्या आयटीआय भागात शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या आदेशाची होळी करत शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जवळपास अर्धा ते एक तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी तीन वाजता आयटीआय जवळील महात्मा फुले पुतळ्याजवळ सर्व शिवसैनिक जमा झाले आणि त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीचा निषेध करत शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी शासन आदेशाची होळी करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, सहसंपर्कप्रमुख भागवत जाधव, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, उपजिल्हाप्रमुख सतीश पाटील उमरेकर, शहरप्रमख आनंद जाधव, तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, सिडको शहरप्रमुख जितूसिंह टाक, जिल्हा संघटक नरहरी वाघ, महानगर संघटक नवज्योतसिंघ गाडीवाले, बालाजी पेनूरकर, शैलेश रावत, पिंटू सुनपे, शहर संघटक गौतम जैन, जिल्हा संघटक अविनाश तरोडेकर, नंदू पाटील वैद्य, हनुमंत भवर, माधव पांचाळ, युवासेना जिल्हा युवाधिकारी अक्षय वट्टमवार, रवी नागरगोजे, नवनाथ जोगदंड, दिलीप ठाकूर, हरी धुमाळ, मनोज काकडे, प्रभाकर सोनटक्के, एकनाथ मोगरकर, सचिन पाटील, निवृत्ती जिंकलवाड, ब्रिजलाल उगवे, लक्ष्मणराव भोसले यांच्यासह असंख्य शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंडलवाडी-राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणार्या शासनाच्या हिंदी सक्ती आदेशाची होळी नायगाव, देगलूर, किनवट विधानसभेचे सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी यांच्या नेतृत्वाखाली धर्माबाद शहरातील पानसरे चौकात दि.29 जून रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आली.
यावेळी हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात लागू करण्यात येवू नये. यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा संघटक रामचंद्र रेड्डी, उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी, नायगाव विधानसभा संघटक शिवराज पाटील मोकलीकर, तालुकाप्रमुख मारोती कागेरू, शहरप्रमुख बालाजी बनसोडे, पांडुरंग पांचाळ, अशोक रामोड, शकर आवरे, राजु शिरामने, गणपत कात्रे, लक्ष्मण निदानकर, फिरोज कुरेशी, माधवराव मागे, विकाश शिंदे, मारोती धुप्पे, गणेश दूदूलवाड, देविदास निदानकर, लक्ष्मण कारमोड, लक्ष्मण रापतवार यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र माहूर-शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुपारी बारा वाजता हिंदी सक्तीच्या विरोधात जीआरची होळी करण्यात आली आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल, उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव, युवासेना जिल्हा युवाधिकारी यश खराटे, शिवसेना तालुकाप्रमुख जितू चोले, शहर प्रमुख बालाजी वाघमारे, युवासेना जिल्हा समन्व्यक आकाश सातव, तालुकाप्रमुख अक्षय वाघ, संदीप गोरडे, गजानन चव्हाण, मंगेश सुकळकर, अभिषेक जयस्वाल, दीपक कांबळे, अरविंद दवणे, वाशीम शेख, कनिष्क वानखेडे, आशीर्वाद आढावे, विनोद मार्गमवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देगलूर-केन्द्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली राज्य सरकारने महाराष्ट्रात अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या सक्तीमुळे मराठमोळ्या महाराष्ट्रातच मराठीला दुजाभाव सहन करावा लागणार आहे. भाजप, शिंदे-सेना सरकारच्या काळात आधीच मराठी माणसावर अन्याय वाढले असताना आता हिंदी सक्ती केली जात असल्यामुळे मराठी माणसांकडून सरकारच्या निर्णया विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आज दिनांक 29 जून रोजी सकाळी 11 वाजता अण्णाभाऊ साठे चौक देगलूर शासनाच्या आदेशाची होळी करुन शेतकरी विरोधी वक्तव्य करणार्या भाजपचे माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या व मनसेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर, तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर, विधानसभा प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शहरप्रमुख संजय जोशी, अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख युसुफ भाई मिस्त्री, अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख सय्यद मिर सय्यद हनुमिया, उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवासेना शहर समन्वयक संतोष कांबळे, युवासेनेचे संदीप शिंदे, गणेश चप्पलवार, राहुल सोनकांबळे, उपविभाग प्रमुख हाणमंत राजुरे, उपविभाग प्रमुख सुभाष खुनेवाड, उपविभाग प्रमुख शंकर जाधव हाळीकर, उपविभाग प्रमुख गंगाधर पुंजपवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हा सरचिटणीस प्रवीण मंगनाळे, शिवसेना तालुकाप्रमुख मन्मथ खंकरे खानापूरकर, विश्वंभर कंतेवार, चंदू अंक्यमवार, चॉदपाशा, मनसे तालुका उपाध्यक्ष हनुमंत उच्च, मनसे खानापूर सर्कल प्रमुख आनंद कामशेट्टी, तालुका उपाध्यक्ष नागेश पल्ला पवार, मोगलाजी वल्लपवार, विश्वंभर कन्तेवार, मनसे तालुका संघटक शेख आजार, शहर उपाध्यक्ष शेख चांद आदीसह शिवसेना, युवासेना, मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाच्या तसेच हिंदी विरोधी व शेतकर्याबद्दल व महिलाबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर केल्याबद्दल बबनराव लोणीकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.