
सामना प्रतिनिधी। नांदेड
नांदेड जिल्हयातील सोनखेड तालुक्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेल्या आगीत एसबीआय बँक जळून खाक झाली आहे. यात बँकेतील संगणक,रजिस्टर व इतर साहीत्य असे एकूण २० लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या सामानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.































































