नंदकुमार देशपांडे यांचे निधन

नागोठणे पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य, पत्रकार नंदकुमार देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अस्मिता देशपांडे या आहेत. देशपांडे यांनी काही काळ दैनिक ‘सामना’चे नागोठणे येथील वार्ताहर म्हणूनही काम पाहिले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. देशपांडे यांच्या पार्थिवावर नागोठणे वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.