नारायण सावंत यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे प्रसिद्धी प्रमुख नारायण सावंत यांचे सोमवारी अकस्मात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सत्यवती, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. विलेपार्ले येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतरण तलाव असलेल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या निर्मितीपासून या संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून नारायण सावंत यांनी अत्यंत सक्षमपणे जबाबदारी सांभाळली. क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धांना तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या क्रीडा संकुलाच्या खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सावंत गेली 30 वर्षे प्रचंड पाठपुरावा करत होते. दहा वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. मात्र त्यानंतरही ते क्रीडा संकुलापासून दुरावले नाही आणि त्यांनी संकुलाच्या प्रसिद्धीची जबाबदारी पार पाडली. ते शेवटपर्यंत क्रीडा संकुलाच्या उपक्रमांच्या आणि स्पर्धांच्या बातम्यांसाठी मेहनत घेत राहिले.