टाटांसमोर नारायण मूर्ती नतमस्तक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आयोजित ‘टायकॉन-2020’ परिषदेत मंगळवारी संध्याकाळी उद्योजकांना पुरस्कार देण्यात आले. या वेळी टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार इन्फोसीसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी रतन टाटा यांना दिला. पुरस्कार दिल्यानंतर मूर्ती यांनी टाटांसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. कॉर्पोरेट जगतातील दोन दिग्गजांमधील या भावनिक नात्याने उपस्थितही भारावून गेले.