
सामना ऑनलाईन । मुंबई
रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज मुंबई येणार असून त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात्त आले आहे. घाटकोपरमधील श्री भाटिया वाडी हॉल, कामदार हॉस्पिटलच्या बाजूला, टिळक रोड य़ेथे शनिवारी व रविवारी सकाळी ९ वाजता त्यांचे आगमन होऊन पुढील कार्यक्रमास सुरूवात होईल.
महाराजांच्या प्रेरणेने मरणोत्तर देहदानाचे ५६,५३७ अर्ज महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांकडे सुपूर्द केले. भारतीय लष्करासाठी ७,८४८ आणि महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्याकरीता ६५,४८२ रक्त कुपिका दान करण्यात आल्या. महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवा अनेक राष्ट्रीय महामार्गावर चालू आहेत यामुळे आतापर्यंत जवळजवळ १०,७७७ अपघातग्रस्तांचे प्राणही वाचलेत.
अधिकाधिक संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




























































