दरवर्षी पाच परदेशी कुटुंबांना हिंदुस्थानात पाठवा, पंतप्रधानांचे अनिवासी हिंदुस्थानींना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील पर्यटन व्यवसाय वाढण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कंबर कसली आहे. म्हणूनच दरवर्षी किमान पाच परदेशी कुटुंबांना हिंदुस्थानात पाठवा, असे आवाहन त्यांनी जगभरातील अनिवासी हिंदुस्थानींना रविवारी केले. अमेरिकेतील ह्युस्टन येथे गुजराती समुदायासमोर बोलताना मोदींनी हे आवाहन केले.

आपल्या सात दिवसांच्या अमेरिका दौऱयावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी एटर्नल गांधी म्युझियमच्या ग्राऊंड ब्रेकिंग सेरेमनीसाठी पट्टीकेचे अनावरण केले. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर भाषणात ते म्हणाले की, तुम्हाला माझ्यासाठी काही करायचे आहे का? तशी तुमची इच्छा असेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे. जे जे आतापर्यंत कामानिमित्त हिंदुस्थानच्या बाहेर गेले आहेत त्या जगभरातील सर्व अनिवासी हिंदुस्थानींना मी सांगू इच्छितो की, त्यांनी किमान पाच परदेशी कुटुंबांना पर्यटक म्हणून हिंदुस्थानात पाठवावे.