
सामना प्रतिनिधी । अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातच्या अहमदाबाद येथील सभेमध्ये बेलताना पाकिस्तानसह दहशतवाद्यांना कडक शब्दांत इशारा दिला. मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. एकेका शत्रूचा शोधून शोधून बदला घेणे माझा स्वभाव आहे, त्यांना (दहशतवाद्यांना) घरात घुसून मारू, असा इशारा मोदी यांनी यावेळी दिला.
विरोधी पक्षातील काही नेत्यांची विधाने पाकिस्तानातील वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स बनत आहेत, असेही मोदी यांनी सांगत विरोधकांना त्यांनी लक्ष्य केले. ते अहमदाबाद येथील एका सभेमध्ये बेलत होते.






























































