
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया फेल झाल्यानंतर गुजरातमधील मोठा प्रकल्प साबरमती रिव्हर क्रूझही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ऑपरेटिंग कंपनीला 3.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोदी यांचा हा प्रोजेक्टसुद्धा अपयशी ठरला आहे, अशी चर्चा आहे. 2023 मध्ये साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने साबरमती रिव्हरफ्रंटवर पहिल्यांदाच रिव्हर क्रूझ सेवा सुरू केली, परंतु नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्याने रिव्हर क्रूझ आता बंद पडण्याच्या स्थितीत आहे. गेल्या पाच वर्षांत नदीतील गाळ खूप वाढला आहे, ज्यामुळे नदीत गाळ जास्त आणि पाणी कमी आहे. कधीकधी यामुळे क्रूझचेही नुकसान होते. या सर्व गोष्टींमुळे अक्षर रिव्हर क्रूझला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. मोदी यांचा हा चौथा प्रकल्प आहे, जो बंद पडणार आहे. याआधी स्वप्नातील प्रकल्प, झिपलाइन, समुद्री विमान आणि हेलिकॉप्टर राइडचा समावेश आहे.
क्रूझ कंपनीला साडेतीन कोटींचे नुकसान
मेक इंडिया मोहिमेंतर्गत, साबरमती रिव्हरफ्रंटवर रिव्हर क्रूझ सुरू करण्यात आला होता, परंतु साबरमती नदीत पाण्याअभावी क्रूझ बंद पडल्याने सुमारे 3 ते 3.5 कोटींचे नुकसान झाले, असे अक्षर ट्रॅव्हल्सचे सुहाग मोदी यांनी सांगितले आहे. पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता नदीतून पाणी सोडले जाते, ज्यामुळे क्रूझ बंद करावे लागते. रिव्हरफ्रंट कॉर्पोरेशनच्या दुटप्पी धोरणामुळे आतापर्यंत 3.5 कोटींचे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले.
याआधी तीन प्रकल्प बंद
2020 मध्ये केवडिया सी-प्लेन प्रकल्प मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आला होता, परंतु साबरमती नदीच्या पाण्यामुळे आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे तो प्रकल्पही बंद करावा लागला. त्यानंतर नदीकाठावर साहसासाठी झिपलाइन सुरू करण्यात आली, तीही बंद करावी लागली. 2024 मध्ये हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली, ज्यामध्ये अहमदाबादचे दृश्य पाहण्यासाठी हेलिकॉप्टर राईड सुरू करण्यात आली, परंतु ही सेवा तर अल्पावधीत बंद करावी लागली. मोदी यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात येतात आणि ते काही महिन्यांत किंवा वर्षांत बंद केले जात आहेत.