मोदी सरकारची अवस्था दारुडय़ासारखी, केंद्राच्या धोरणावर आंबेडकर यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची अवस्था ही एखाद्या दारुडय़ासारखी झाली आहे. दारुडा घरातील वस्तू  कशी विकतो त्याप्रमाणे सरकार मालमत्ता विकत सुटले आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर टीकास्त्र सोडले.

सरकार चालवण्यासाठी सरासरी 13 लाख कोटी रुपये लागतात. मात्र नवा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत एवढी रक्कम सरकारी तिजोरीत जमेल की नाही, याबाबत शंका आहे. केंद्र सरकारला साधारण 12 लाख कोटींची तूट पडेल. तसेच  अमेरिका-इराण युद्ध सुरू झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती आंबेडकर यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. देशाच्या आर्थिक परिस्थितीकरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी यासारखे मुद्दे पुढे केले जात असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.