
‘आपलं कवच उत्तम आणि आधुनिक असलं तरी युद्ध पूर्ण संपेपर्यंत शस्त्र टाकू नये. सावध रहा. मास्क घालण्यास टाळाटाळ करू नका. बाहेर जाताना चप्पल घालतोच तसंच मास्कही वापरा’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला उत्सवांच्या काळात निष्काळजीपणा टाळण्याचं आवाहन केलं.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी हिंदुस्थानने कोरोनाशी दिलेल्या लढ्याचे कौतुक केले. याचं श्रेय त्यांनी देशातील वैज्ञानिक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि जनतेच्या संयम आणि ऐक्याला दिले. ‘जगभरात हिंदुस्थानविषयी चिंता व्यक्त करण्यात येत होती. हिंदुस्थान या साथरोगाशी कसा लढणार? लस खरेदीसाठी पैसे कुठून आणणार? असे अनेक प्रश्न विचारले जात होते. पण हिंदुस्थाने वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवत दोन लस बनवल्या आणि अत्यंत वेगानं 100 कोटी डोसचा टप्पा पार केला’, असेही ते म्हणाले.
देश बड़े लक्ष्य तय करना और उन्हें हासिल करना जानता है।
लेकिन, इसके लिए हमें सतत सावधान रहने की जरूरत है।
हमें लापरवाह नहीं होना है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2021
देशाने हा महत्वाचा टप्पा गाठला असताना पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना भविष्यातही सतर्क राहण्याची विनंती केली आहे. कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून त्यातच दिवाळीचा सण जवळ आला असल्याने तो धूमधडाक्यात साजरा करण्याचे प्लॅन आखले जात आहेत. मोदी म्हणाले की उत्सवादरम्यान सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. मोठी उद्दीष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून ती कशी गाठायची हे देशाला माहिती असून त्यासाठी आपल्याला सावध राहण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कवच कितीही उत्तम असले तरी युद्ध सुरू असताना हातातील शस्त्र कधीही खाली टाकायची नसतात असे त्यांनी म्हटले.
कवच कितना ही उत्तम हो,
कवच कितना ही आधुनिक हो,
कवच से सुरक्षा की पूरी गारंटी हो, तो भी, जब तक युद्ध चल रहा है, हथियार नहीं डाले जाते।
मेरा आग्रह है, कि हमें अपने त्योहारों को पूरी सतर्कता के साथ ही मनाना है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2021
‘दोन लसींच्या निर्मितीनंतर आता ‘मेड इन इंडिया’ची ताकद खूप मोठी आहे हे आता सर्वांना कळालं आहे. ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्याचा आग्रह ठेवा. ‘व्होकल फॉर लोकल’ हे आपल्याला प्रत्यक्षात आणावं लागेल. दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी वाढते. तेव्हा दिवाळीत ‘मेड इन इंडिया’ वस्तूंची खरेदी अधिक व्हावी’, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.





























































