नरेंद्र मोदी ‘स्टार ऑफ घाना’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ असे पुरस्काराचे नाव आहे. हा सन्मान म्हणजे हिंदुस्थान आणि घानाचे मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्याप्रतीची जबाबदारी आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.