देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड नाही, पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी ठणकावले

1438

सीमेपलीकडील शत्रूंकडून देशाअंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्यात येत आहे. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षेबाबत कोणतेही तडजोड केली जाणार नाही. बाह्य आक्रमण अणि छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तर सीमेपलीकडील शत्रूकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानालाही चोख प्रत्युत्तर देण्याचे मोदींनी शत्रुराष्ट्रांना ठणकावले. पुण्यातील पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’ (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) संस्थेच्या आवारात आयोजित पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषदेत त्यांनी शनिवारी मार्गदर्शन केले.

तंत्रज्ञानातील बदल, त्या अनुंषगाने होणारा तपास, देशांतर्गत सुरक्षा तसेच दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया या विषयांवर मोदींनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बाह्य आक्रमणापासून देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच देशवासियांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, काल या परिषदेच्या उद्घाटनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

तीन दिवसांच्या पोलीस महासंचालक परिषदेची सांगता रविवारी (9 डिसेंबर) होणार आहे. या परिषदेस राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह 180 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर परिषदेत चर्चा केली जाणार आहे. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्यकीय आणि शास्त्रीय तपास आहे.

आपली प्रतिक्रिया द्या