नरेंद्र मोदी मते चोरून बिहारमध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत – मल्लिकार्जुन खरगे

नरेंद्र मोदी मते चोरून बिहारमध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने सतर्क राहिले पाहिजे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेलय मतदार हक्क यात्रेचा समारोप बिहारमधील पाटण्यातील गांधी मैदानात झाला. यावेळी आयोजित सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जगात अनेक अडचणी असताना महात्मा गांधी, नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. गरीब, दलित आणि मागवर्गीय लोक मतदान करू शकत नव्हते. मतदान करण्यासाठी मालमत्ता असणे आणि शिक्षित असणे, अशा परिस्थिती आवश्यक होत्या. मतदानाचा हा अधिकार गरीब अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि महिलांचा मूलभूत अधिकार आहे. तो जपा. संविधान आणि लोकशाही मजबूत करा.”