कुडाळ : कोकणात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

313

कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने सोमवारी साध्या पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी केली. दरवर्षी आयोजित केली जाणारी रिक्षा मिरवणूक यावर्षी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली. एक मानाची रिक्षा सजवून येथील भंगसाळ नदीत श्रीफळ अर्पण करण्यात आले.

सुरूवातीला श्री देव पाटेश्वर मंदीरातील पालखीने निघालेला मानाचा नारळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या हस्ते नदीत अर्पण करण्यात आला. दरवर्षी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने नारळी पौर्णिमे निमित्त शिवसेना प्रणित रिक्षा युनियनच्या वतीने रिक्षा रॅली काढून भंगसाळ नदीत श्रीफळ अर्पण करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर रॅली रद्द करून अतिशय साध्या पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. शिवसेना शाखा येथे श्रीफळ वाढवून एका मानाच्या रिक्षेने भंगसाळ नदी पर्यंत जात काही मोजक्याच पदाधिका-यांच्या उपस्थित नदीत श्रीफळ अर्पण करण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी तालुका प्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, न.पं. गटनेते बाळा वेंगुर्लेकर, नगरसेवक सचिन काळप, रिक्षा सेना युनियन तालुका प्रमुख किरण शिंदे, शहर युनियन शहर प्रमुख नागेश जळवी, अनुप चेंदवणकर, संजय मसुरकर, गोटया चव्हाण आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या