
नासा या महिन्यात एक मोहीम हाती घेणार आहे. या मोहीमेचे स्वरूप ऐकल्यानंतर तुम्हाला हॉलिवूड चित्रपट आर्मगेडन आठवेल. कारण या मोहीमेअंतर्गत एक उल्केवर अंतराळायान सोडण्यात येणार आहे. अंतराळयान या उल्केवर आदळवून तिचा नाश करण्याचे नासाने ठरवले आहे.
या मोहीमेचे नाव डबल ऍस्ट्रॉईड रिडायरेक्शन टेस्ट आहे. या मोहीमेचे मुख्य लक्ष्य Dimorphos असून हा पृथ्वी जवळील Didymos ची परिक्रमा करणारा एक छोटासा चंद्र आहे.
या उल्केचा पृथ्वीला धोका नाहीये, मात्र भविष्यात एखादी उल्का पृथ्वीच्या दिशेने येत असल्यास ती अंतराळयानाने नष्ट करता येऊ शकते याची चाचणी या मोहीमेअंतर्गत करण्यात येणार आहे.
या चाचणीसाठी नासा पृथ्वीवरील एका दुर्बीणीचा उपयोग करून या चाचणीचे निरीक्षण करणार आहे. या उल्केचे दिशा बदलता येईल का आणि भविष्यात अशा प्रकारे उल्केचा धोका टाळता येईल का हे सुद्धा या चाचणीतून समोर येणार आहे.
नासाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार डार्ट मिशनमध्ये कायनेटिक इम्पॅक्टर नावाचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. उल्कावर रॉकेट आदळून त्याची दिशा बदलण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.
धोकादायक उल्कांचा नाश करण्यासाठी हा मार्ग सर्वात प्रभावी असून भविष्यात अशा प्रकारचा धोका दूर करण्यासाठी आणि पृथ्वीला मजबूत सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरेल असेही त्यांनी सांगितले.
आंतराळयानासाठी नवनवीन सुविधांची चाचणी या मोहिमेत करण्यात येणार आहे. या मध्ये इंधन बचतीसाठीच्या NEXT-C ion propulsion system ची चाचणी करण्यात येणार आहे.




























































