या आठवड्यात पृथ्वीजवळून जाणार 5 लघुग्रह, नासा ठेवणार नजर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या शास्त्राज्ञांचे लक्ष या आठवड्यात पृथ्वीजवळून जाणाऱया पाच लघुग्रहांकर असणार आहे. हे पाचही लघुग्रह 64 हजार किमी प्रतितास या वेगाने पृथ्वीजवळून जाणार आहेत. मात्र यापासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020एमके हा लघुग्रह 27 जूनला ताशी 64 हजार किमी प्रतितास या वेगाने पृथ्वीजवळून जाणार आहे. त्यानंतर 17 मीटर व्यासाचा 2020एमएफ1 याच वेगाने पृथ्वीजवळून जाईल. त्यानंतर 2020केक्यू 7 आणि रविवारी 2020 एमई1 आणि 2020जेएक्स1 हे हे लघुग्रह पृथ्कीजकळून जातील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी कर्तकला आहे. हे लघुग्रह पृथ्वीपासून 4 लाख 71 हजार मैल या अंतरावरून जाणार आहेत. त्यामुळे या लघुग्रहांपासून पृथ्कीला कोणताही धोका नाही.

  • 2020 ते 2025 या वर्षात 2018 व्हीपी1 हा लघुग्रह पृथ्कीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता आहे. मात्र हा लघुग्रह केवळ 7 फूट रुंदीचा आहे. यापेक्षा मोठा 177 फुटांचा 2005ईडी224 हा लघुग्रह 2023 ते 2064 या दरम्यान पृथ्वीजवळून जाईल, असा अंदाज आहे. पुढच्या शंभर वर्षांत तब्बल 22 लघुग्रह पृथ्कीच्या अगदी जवळून जातील असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.