नासाने चंद्रावर 4जी नेटवर्क उभारण्याचे काम दिले नोकियाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) चंद्रावर 4जी मोबाईल नेटवर्क उभारण्याचे काम जपानी मोबाईल जायन्ट नोकियाला दिले आहे. भविष्यात माणूस पुन्हा चंद्रावर पाऊल ठेवेल आणि काही वर्षांनी चंद्रावरही मानवी वसाहती निर्माण करता येतील असे नासाच्या संशोधकांचे मत आहे. 2024 पर्यंत मानवाला चंद्राची सफर घडवण्याची नासाची योजना आहे. त्यासाठी आखलेल्या आर्टेमिस प्रकल्पांतर्गत नासाने नोकियाशी चंद्राच्या भूमीवर बिनतारी मोबाईल नेटवर्क उभारण्यासाठी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकिया 2022च्या अखेरीपर्यंत चंद्रावर पहिली वायरलेस ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टम उभारणार आहे. सध्या नोकिया 4जी ब्रॉडबँड नेटवर्कची उभारणी अंतराळात करणार आहे. कारण पृथ्वीवर ही यंत्रणा अतिशय प्रभावी ठरली आहे. चंद्रावरील ब्रॉडबँड सेवेचा लाभ अंतराळवीरांसह भविष्यात चांद्रसफारीला जाणारे नागरिक घेऊ शकतील असे नोकियाचे मत आहे.