नासाच्या ‘सूर्यवारी’त तांत्रिक बिघाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । टांपा

मानवी इतिहासात प्रथमच सूर्याच्या अधिक जवळ जाऊन सौरलहरींच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने सज्ज केलेल्या ‘पार्कर सोलर प्रोब याना’चे प्रक्षेपण शनिवारी तांत्रिक अडचणीमुळे नियोजित वेळेआधी काही क्षण स्थगित करण्यात आले. आता कारच्या आकारातील हे अंतराळ यान रविवारी सायंकाळी केप कार्निवल अंतरिक्ष केंद्रातून सूर्यमोहिमेवर पाठवले जाणार असल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले.