नॅश नॉबर्ट यांच्या बासरीकादनाची मैफल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘उदयस्वर अॅट पृथ्वी’ मध्ये कला सादर करायला निमंत्रण येणं हीच कलाकारांसाठी फार मोठ्या सन्मानाची बाब असते. कारण या कार्यक्रमात दर्जेदार कलाकारांनाच कला सादर करायची संधी मिळते. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सादर होणाऱ्या या मैफलीत येत्या रविवारी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता नॅश नॉबर्ट या अमेरिकन नागरीक असलेल्या बासरीवादकाच्या बासरीचे मधुर स्वर ऐकायला मिळतील. ख्यातनाम बासरीकादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्याचे आपले आयुष्यभराचे ध्येय सुरू केले.  ते बासरीच्या माध्यमातून आपल्या श्वासांना आत्मनिरीक्षणात्मक आणि मन शांत करणाऱ्या संगीताचे स्करूप देतात. ही अतिशय दुर्मिळ आणि खऱ्या अर्थाने वेगळी अकॉस्टिक अनुभव देणारी भारतीय शास्त्रीय संगीताची मैफल आहे.