लाचखोर कृषी उपसंचालकाला पोलीस कोठडी

683

शेतमाल निर्यातीसाठी आवश्यक असलेले फायटो प्रमाणपत्र देण्याकरिता एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव याला न्यायालयाने आज दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

जे अ‍ॅण्ड जे एक्स्पोर्ट्स कंपनीत कार्यरत असलेले एक अधिकारी विविध कृषी कंपन्यांना निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्र (पीएससी) मिळवून देण्याचे काम करतात. त्यांनी नाशिक येथील जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात निरनिराळ्या कंपन्यांचे फायटो प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले होते. कृषी उपसंचालक नरेंद्रकुमार गोविंदराव आघावने त्यांच्याकडे प्रत्येक प्रमाणपत्रासाठी 500 रुपये याप्रमाणे एकूण 1 लाख 64 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली. संबंधिताने याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करून मंगळवारी सापळा रचला. मागितलेल्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात एक लाख रुपये घेताना आघावला रंगेहाथ पकडण्यात आले. सुंदरबन कॉलनीतील त्याच्या निवासस्थानाची मंगळवारी रात्री उशीरा झडती घेण्यात आली, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधिक्षक सुनील पाटील यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या