कोरोना रुग्णांवरील उपचारात ‘क्लाऊड फिजिशियन’ची मदत महत्त्वपूर्ण ठरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात लढाई लढताना नाशिक जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयाने बेंगलोर येथील तज्ञांच्या मदतीने क्लाऊड फिजिशियन आणि ई-साय क्लिनिक हे दोन महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करीत प्रभावी उपचारांसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. क्लाऊड फिजिशियनच्या मदतीने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांचे 24 तास लक्ष राहणार आहे, तर कोरोनाची भीती घालविण्यासाठी ई-साय क्लिनिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोर येथील डॉ. ध्रुव जोशी आणि डॉ. रमण यांच्या सहकार्याने क्लाऊड फिजिशियन उपक्रम राबविण्यात येत आहे. बेंगलोरमधील तज्ञांचे पथक जिल्हा रुग्णालयातील 20 बेड आणि 20 व्हेंटिलेटरचे सनियंत्रण करतील. अतिदक्षता विभागातील पॅमेऱयांच्या मदतीने त्यांचे 24 तास रुग्णांवर लक्ष राहील. रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन तत्काळ ते उपस्थित डॉक्टरांना उपचारासाठी मार्गदर्शन करतील.

ई-साय क्लिनिक हे सातही दिवस 24 तास सुरू राहणार आहे. 7303250515 या क्रमांकावर निःशुल्क मानसिक आजारावरील समुपदेशन केले जाणार आहे. या उपक्रमांना बेंगलोर येथील एसीटी संस्थेने अर्थसहाय्य केले आहे.