शंभर रुपये आकारण्याचा निर्णय मागे; कालिका देवीचे दर्शन मोफत मिळणार

नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवीच्या दर्शनासाठी प्रतीभाविक शंभर रुपये घेण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे.

मंदिर परिसरातील जास्तीची गर्दी टाळण्यासाठी टोकण पद्धतीने दर्शन देण्याचा आणि त्यासाठी शंभर रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे नाराजी व्यक्त होत होती. भाविकांच्या भावनांचा विचार करून सशुल्क दर्शनाचा हा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मागे घेण्यात आला. आता दर्शन व्यवस्थेसाठी लागणारा खर्च विश्वस्त करणार आहेत, असे कालिका देवी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी सांगितले. मोफत दर्शनाच्या या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या