
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
नाशिक आणि पुणे शहर रेल्वेमार्गाने जोडले जावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांचा पाठपुरावा सुरू होता. मध्य रेल्वे प्रशासन मंडळाच्या पाठोपाठ आता 2 जून रोजी रेल्वे मंत्रालयानेही या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली आहे. या रेल्वेमार्गासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.






























































