नाशिक जिह्यात 56 टक्के मतदान

377

किरकोळ तक्रारी वगळता नाशिक जिह्यात उत्साहात, शांततेत मतदान झाले. जिह्यात एकूण 56 टक्के मतदान झाले. सुरगाणा-कळवण मतदारसंघात सर्वाधिक 67.82 टक्के मतदान झाले. शहरापेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी जास्त होती.

शहरासह जिह्यातील मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत वेग कमी होता. त्यानंतर मात्र मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या. कळवण-सुरगाणा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिह्यात सर्वाधिक 67.82 टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात सर्वच मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह असल्याने तेथील टक्केवारी अधिक आहे. त्यातुलनेत नाशिक शहरातील चारही मतदारसंघांची टक्केवारी कमी होती. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा सहानंतरही असल्याने तेथील टक्का काहीसा वाढू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या