हिंदुस्थानचा संघ तर एकदम चिल्ली-पिल्ली, नासिर हुसैनची टीका

75

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला पहिल्या दोन कसोटीमध्ये पराभव सहन करावा लागल्यानंतर विराट अँड कंपनीवर टीकेचा वर्षाव सुरू आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने टीम इंडियावर बोचरी टीका केली आहे. टीम इंडियामध्ये लढाऊ वृत्तीचा अभाव असल्याचे म्हणत हा सामना म्हणजे मर्द आणि चिल्ली-पिल्लींमध्ये असल्याचे हुसैन म्हणाले.

खराब कामगिरीवरून शास्त्री-कोहलीवर बीसीसीआय ओढणार आसूड

इंग्लंड दौऱ्यात बर्मिंगहॅम येथे झालेली पहिली कसोटी 31 धावांनी गमावल्यानंतर टीम इंडियाला लॉर्ड्स कसोटीत 1 डाव 159 धावांनी स्वीकारावा लागला. यानंतर हुसैन स्काई स्पोर्टसशी बोलताना म्हणाले की, इंग्लंडचा संघ सध्या जगातील सर्वोत्तम संघ आहे. परंतु सर्वांच लक्ष हिंदुस्थानवर असणार आहे. कारण त्यांची गाडी तर आता रूळावरून घसरत चालली आहे. तसेच हिंदुस्थानचा संघ कसोटीत नंबर एक आहे आणि ही मालिका रोमहर्षक व्हायला हवी होती. परंतु सध्या तरी हा सामना मर्द गडी आणि चिल्ल्या-पिल्ल्यांमध्ये सुरू असल्याचे दिसत आहे. हिंदुस्थानची गाडी चुकीच्या दिशेने जाताना दिसत आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या