
राष्ट्रीय खो-खोपटू सुनील लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सुनील लाड हे डॉ. शिरोडकर हायस्पूल व महर्षी दयानंद काॅलेजचे विद्यार्थी असून युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये त्यांनी 1986 ते 1989 या कालावधीत सलग चार वेळा मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. दुकाने व आस्थापना विभागात कार्यरत असताना त्यांनी प्लास्टिकविरोधात प्रभावी जनजागृती केली. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पालिकेतर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता.



























































