हिमाचलमध्ये बसवर दरड कोसळून 18 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिह्यात एका खासगी बसवर दरड कोसळून तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. अनेक प्रवासी बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ‘संतोषी’ नावाची खासगी बस मारोटनहून घुमरविनला जात असताना बार्थिन भागातील भल्लू पुलाजवळ हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे अचानक डोंगरावरून ढिगारा आणि मोठे दगड बसवर पडले. या ढिगाऱ्यात बस पूर्णपणे गाडली गेली.