
सिक्कीममध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे त्सोमगो तलावाजवळील शेराथांग आणि आसपासच्या भागात अंदाजे 2,736 पर्यटकांना घेऊन जाणारी एकूण 541 पर्यटक वाहने अडकली. सुदैवाने अडकलेल्या सर्व पर्यटकांना आणि वाहनांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
एसएचओ, चेक पोस्ट अधिकारी, पर्यटन परवाना सेल अधिकारी, आस्थाचे अध्यक्ष आणि सदस्य, जीआरईएफ/बीआरओ कर्मचारी, जेएन रोड ड्रायव्हर्स असोसिएशन, ट्रॅव्हल एजन्सी आणि इतर स्थानिक संबंधितांच्या उपस्थितीत तात्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आले. संयुक्त बचाव मोहिम रावबत सर्व अडकलेल्या वाहनांना आणि पर्यटकांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आहे.
शेराथांग आणि आसपासच्या परिसरात मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले. यामुळे 15 व्या मैल आणि त्सोमगो तलावाजवळ 541 पर्यटक वाहने अडकली. संयुक्त प्रयत्नांद्वारे 2,736 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या सर्व वाहनांना बाहेर काढण्यात आले. पर्यटन विभागाने पर्यटकांना आणि टूर ऑपरेटर्सना हवामानाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.





























































