दिल्लीत हवेची गुणवत्ता घसरली

दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. या हंगामात पहिल्यांदा ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लॅनचे प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. बांधकामस्थळी धुळीवर नियंत्रण, कचऱ्याचे व्यवस्थापन, नियमितपणे रस्त्यांची सफाई यासारखे उपाय केले जातील.