
हैदराबादच्या बेगमपेट येथील हवामान खात्याचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता एक धमकीचा ई-मेल मिळाला. यात धमकी दिली की, या कार्यालय परिसरात 14 बॉम्ब लपवले आहेत. या बॉम्बचा दुपारी स्पह्ट घडवणार आहे. ही धमकी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. सूचना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब स्क्वॉडने संपूर्ण परिसराची तपासणी केली, परंतु या ठिकाणी संशयास्पद कोणतीही वस्तू आढळली नाही. पोलीस आता ई-मेल कुठून करण्यात आला त्याचा आयपी अॅड्रेस शोधत आहेत.
























































