मोबाईल पासवर्डवरून झालेला वाद विकोपाला गेला, मुलीसमोरच पतीने पत्नीला चाकूने भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

मोबाईल पासवर्डवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिखा मिश्रा असे पीडित पत्नीचे तर दीपक मिश्रा असे आरोपी पतीचे नाव आहे.

लाईव्ह हिंदुस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात राहणाऱ्या मिश्रा दाम्पत्याला तीन मुली आहेत. पती-पत्नी एकमेकांचे माबाईल पासवर्ड मागत होते. मात्र दोघांनीही आपला पासवर्ड सांगितला नाही. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दीपकने शिखावर चाकूने अनेक वार केले. यात शिखा गंभीर जखमी झाली. यानंतर दीपक पळून गेला.

गंभीर जखमी शिखाला तात्काळ संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.