मध्य प्रदेशात कांदा दोन रुपये किलोने विक्री

सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देऊ असे आश्वासन देणाऱ्या भाजपने मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर जिह्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला केवळ 170 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 1.70 रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. कांद्याला दोन रुपये भाव मिळाल्याने काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर करून काँग्रेसने केंद्र सरकार आणि मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. कांद्याच्या लागवडीसाठी केलेला खर्चही विक्रीतून निघाला नाही, असे मंदसौरमधील शेतकरी बब्बू मालवी यांनी सांगितले.