
आय स्क्वॅश ऍकॅडमीतर्फे ‘सीएसके आय स्क्वॅश करंडक’ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॅश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही 2-स्टार स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया (एसआरएफआय) राष्ट्रीय स्पर्धा 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंढवा येथील चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. स्पर्धेमध्ये देशातील 8 राज्यांतील सुमारे 180 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
या स्पर्धेत देशातील ज्युनिअर गटातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, चेन्नई, कर्नाटक, गोवा अशा 8 राज्यांमधील सुमारे 180 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा मुले आणि मुली 9, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील ज्युनिअर गट अशा विविध गटांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकेरी गटात सामने होणार असून हे सामने बाद फेरी पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्व गटांतील पहिल्या 8 विजेत्यांना करंडक आणि मेडल्स देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून 70 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.


























































