
जुन्या काळातील नाटय़ संमेलनांचा इतिहास, नाटय़विषयक काम करणाऱया संस्था, आतापर्यंत कुठे आणि कधी नाटय़संमेलन पार पडले, त्याचे अध्यक्षपद कोणी भूषविले … अशी सर्व माहिती जाणून घेण्याची संधी नाटय़रसिक आणि रंगकर्मींना मराठी नाटय़संमेलन अध्यक्षीय ‘नाटय़ सूर्यमाला’ या ग्रंथाच्या रूपाने उपलब्ध झाली आहे. मुंबई मराठी साहित्य संघाने या ग्रंथाची निर्मिती केली आहे.
या ग्रंथाविषयी मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह सुभाष भागवत सांगतात, साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव यांना सुचली. गेल्या 95 वर्षांच्या कालखंडातील नाटय़संमेलनाचा, त्यासाठी अध्यक्षपद भूषविलेल्या अध्यक्षांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. यामुळे नाटय़संमेलनाचा इतिहास, अध्यक्षांची नाटय़संपदा, त्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकेची माहिती, नाटय़संमेलनाची क्रमवार आणि सालवार वाटचाल अभ्यासक आणि कलाकारांना हवी तेव्हा उपलब्ध होईल.
प्रत्यक्षात कै. श्री. शं. ना. अंधृटकर यांनी पहिल्या संमेलनापासून ही सूर्यमाला 1997 सालापर्यंत लिहिली होती. त्यानंतर ते काम बंद होतं. ते पुन्हा सुरू करण्यात आलं. सगळ्या रंगकर्मींना हा ग्रंथ मागदर्शक म्हणून उपलब्ध होऊ शकतो. बऱयाच जुन्या रंगकर्मींची रंगसाधना आणि कलासंपदा यांची माहिती, संगीत नाटकं, बालनाटय़े, मराठी, हिदी, इंग्रजी, संस्कृत नाटकांची माहिती, त्यांची वैशिष्टय़पूर्ण कामगिरीही यामध्ये प्रसिद्ध केली आहे. दुर्मिळ छायाचित्रे असलेल्या या 250 पानी ग्रंथात एकूण 98 संमेलनांचा इतिहास वाचायला मिळतो.
काही कलाकारांच्या वयोमनामुळे नातेवाईकांकडून त्यांचा परिचय लिहून घेणे, त्याचा पाठपुरावा करणे, यामध्ये काही परदेशातीलही होते. पूर्वी इ-मेल, संकेतस्थळ अशी सुविधा नव्हती. आता या गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत, त्यामुळे काम करणे सोपे होतेय, असे सुभाष भागवत या ग्रंथ प्रक्रियेविषयी सांगतात.
76 व्यक्तिचित्रे रंगीत स्वरूपात
या ग्रंथात एकूण 76 रंगीत स्वरूपातील व्यक्तिचित्रांचा संग्रह नाटय़रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चित्रकार दशरथ सोनार यांनी ही सर्व व्यक्तिचित्रे कौशल्यपूर्ण शैलीने काढली आहेत. व्यक्तिचित्रांच्या मागील बाजूवर संबंधित कलाकाराचा कर्तृत्वपट छापण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे नाटय़देवता म्हणून ग्रंथात असलेले अर्धनारीनटेश्वरचे चित्रही अनोखे आणि वैशिष्टय़पूर्ण आहे.
रंगकर्मींचा स्वाक्षरीसंग्रह
रंगभूमीचे जनक, संगीत नाटकाचे प्रणेते, संमेलनाचे प्रणेते आणि अध्यक्षांच्या स्वाक्षऱया यामध्ये पाहायला मिळतात. यांचे वैशिष्टय़ असे की, यातील काही सह्या मोडी लिपीतील आहेत.




























































