
मुंबईत तैनात असलेल्या नौदलाच्या आयएनएस आंग्रे या युद्ध नौकेवरील एका जवानाने आत्महत्या केली आहे. अखिलेश यादव असं या जवानाचं नाव आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, यादव हे आंग्रे या युद्धनौकेवर तैनात होते. त्यांनी गुरुवारी स्वतःच्या रायफलीतून स्वतःवर गोळी झाडली. त्यांना जवळच्याच आयएनएचएस अश्विनी या नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांना यादव यांच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.





























































