
भाजपचे वाशीमधील उमेदवार अवधूत मोरे यांनी मच्छी मार्केटमुळे येथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा जोरदार फटका या निवडणुकीत भाजपला बसणार आहे.
अवधूत मोरे यांनी वाशीमधील एका मार्केटमध्ये व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या मच्छी मार्केटमुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. असे त्यांनी व्हिडीओमध्ये नमूद केले आहे. हे मार्केट फार जुने आहे. कोळी समाज या ठिकाणी मच्छी विक्रीचा व्यवसाय करतो. दरम्यान आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा मोठा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश ਸਾਈਕ ਗਾਂਡੀ ਅਤਾਕਾ ਟਿਕਾ ਸਾਰੇ




























































