
नौदल आणि कोस्टगार्डचे स्वदेशी एएलएच ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर लवकरच उड्डाण घेणार आहे. जानेवारीत पोरबंदर येथे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर ध्रुव हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवण्यात आले होते. आता तपासणी पूर्ण झाल्यावर पुन्हा उड्डाणासाठी हिरवा पंदिल मिळाला आहे. पोरबंदर दुर्घटनेनंतर धुव हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसाठी आणि अपघाताची कारणे शोधण्यासाठी तपासणी सुरू करण्यात आली होती. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने या तपासणीसाठी एक पथक नेमले होते. त्यांच्याकडून ध्रुव हेलिकॉप्टरची तपासणी झाली आहे. आता हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड सुरुवातीच्या परीक्षणासाठी नौदल आणि तटरक्षक दलाला दोन-दोन हेलिकॉप्टर देईल.

























































