
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा पुढे ढकलली. मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनासाठी दाद मागितली आहे. तथापि, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी अन्य प्रकरणांच्या व्यस्ततेमुळे मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. याप्रकरणी 13 जून रोजी पुढील सुनावणी होईल.
कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली होती. ते किडनी विकाराने त्रस्त आहेत. त्यामुळे विशेष वैद्यकीय काळजी घेण्याची गरज असल्याचा दावा करीत मलिक यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे.
सरदार खानला जामीन
नवाब मलिक यांच्याविरोधातील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणातील सहआरोपी सरदार खानला विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. सरदार खान हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्पह्टाच्या खटल्यातील दोषी असून तो जन्मठेप भोगत आहे.


























































