मी जिथे नमाज पठण करायला जायचो तिथेच ‘तेही’ यायचे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी जिथे नमाज पठण करायला जायचो तिथेच तेही नमाज पठण करायला यायचे. नंतर मला समजलं की त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वापरले. हे उघड होऊ नये म्हणून त्यांनी माझ्या जावयाला खोटय़ा प्रकरणात अडकवले, अशी टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्विटर स्पेसवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही बाब समोर आणली. माझ्या जावयाला जाणूनबुजून अटक करण्यात आली आणि 8 महिने तुरुंगात ठेवण्यात आले. शेवटी त्यांना जामीन मिळाला आणि त्या वेळी न्यायालयाने या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने फसवल्याचे म्हटले.

म्हणून साडेआठ महिन्यांपूर्वी बोललो नाही

आम्ही आर्यन खान प्रकरणातील फर्जीवाडा समोर आणला. माझ्या जावयाला अडकवले म्हणून मी बोललो असे नाही. जावयाला अटक केली तेव्हा मी नाही बोललो. कारण सर्वांचा समज झाला असता जावयाला अटक केल्याने बोलत आहेत. म्हणून मी साडेआठ महिन्यांनी या विषयावर बोललो. याबाबत आम्ही सर्व गोष्टी न्यायालयात ठेवू, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.